अकोला : स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर वाशीम जिल्ह्यात सोमवारी पहाटे पाच वाजता खासगी बसला अपघात झाला. दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी आहेत. जखमींपैकी किमान पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सततच्या अपघातांमुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
पुण्यावरून नागपूरकडे जात असलेल्या राजलक्ष्मी ट्रॅव्हलच्या खासगी बसच्या चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नागपूर लेनवर वनोजा टोल प्लाझापासून मालेगावच्या दिशेला पाच किलोमीटरवर ही दुर्घटना घडली. जखमींना कारंजा व अकोला येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले .
First published on: 18-02-2025 at 01:31 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private bus accident on samruddhi highway in washim district ssb