नागपूर : राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्यानंतर आजपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. राज्याच्या उपराजधानीत पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. उर्वरित महाराष्ट्रात मात्र अजून फारसा पाऊस पडण्याची शक्यता नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजधानी मुंबईत मात्र पावसाने अजूनही दडी मारली आहे. मध्य मुंबईमध्ये गुरुवारी दिवसभरात १ ते ५ मिलीमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली, तर उत्तर मुंबईत एखाद-दुसऱ्या ठिकाणी १० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडला. या व्यतिरिक्त बहुतांश मुंबईमध्ये पावसाची उपस्थिती अजिबात नव्हती. काही काळ ढगाळ वातावरणही मुंबईत निर्माण झाले होते.

हेही वाचा – हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी वणवण!; पुरेशा कागदपत्रांअभावी महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये प्रवेशाची अडचण

हेही वाचा – खळबळजनक! नागपुरातील १०० रुग्णांच्या हातात हत्तीरोगाचे जंतू

पुढील चार दिवसांमध्येही ढगाळ वातावरणाची शक्यता आहे, मात्र फारसा पाऊस नसेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार १८ ते २४ ऑगस्टदरम्यान देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस असू शकेल. या काळात कोकणातही फारसा पाऊस नसेल असे सध्याच्या चित्रावरून स्पष्ट होत आहे. तर २५ ते ३१ ऑगस्टदरम्यानही देशात फारसा पाऊस नसेल, मात्र दक्षिण कोकणात पाऊस अनुभवता येईल, अशी शक्यता आहे. २५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राज्याच्या इतर भागांमध्ये फारशा पावसाची शक्यता नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain return in vidarbha from today what is the situation in maharashtra rgc 76 ssb