लोकसत्ता टीम
नागपूर: जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्यांनी त्यांच्या शाळा,कनिष्ठ महाविद्यालयातून सन २०२३-२४ या सत्रातील फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये दहावी, बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव निकाल कळल्यानंतर सादर करावे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून विभागीय बोर्ड, तालुका, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. यासाठी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,
हेही वाचा… भाजपाने जाहीर केले लोकसभा निवडणूक प्रमुख, आमदार दटकेंकडे नागपूरची जबाबदारी
जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य व शाळांच्या मुख्याध्यापकांनी अशा पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालय सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय. टी. आय समोर श्रद्धानंदपेठ, नागपूर येथे संपर्क करावा.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.