बुलढाणा : राज्यस्तरीय सहकारी पतसंस्था म्हणजे केवळ आर्थिक उलाढाल, व्यावहारिक देवाणघेवाण असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र जिल्ह्यातील आघाडीची संस्था असलेल्या राजश्री शाहू मल्टिस्टेट सहकारी पतसंस्था याला अपवाद ठरली आहे. संस्थेने रक्तदान शिबीर पंधरवडा अभियान सुरू केले असून याद्वारे किमान १ हजार रक्त बाटल्या संकलनाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बुलढाणा जिल्ह्यातील निम्म्या गावांत पाणी टंचाईची चिन्हे; लाखो ग्रामस्थांची पाण्यासाठी होणार पायपीट !

राजश्री शाहू मल्टिस्टेट पतसंस्था व राजश्री शाहू सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मागील २३ फेब्रुवारीपासून या ‘रक्तदान महायज्ञास’ प्रारंभ झाला असून तो १३ मार्च पर्यंत धगधगत राहणार आहे. मध्यप्रदेशासह राज्यातील ७५ शाखांमध्ये हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर शिवजयंती व महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथे १८ फेब्रुवारीला शिबीर घेण्यात आले. यावेळी संस्थेचे कर्मचारी, सभासद व नागरिक मिळून ४२ दात्यांनी रक्तदान केले. यापाठोपाठ२३ फेब्रुवारीला जळगाव जामोद येथे आयोजित शिबिरात ३५, २६ ला शिरपूर (ता. बुलढाणा) ला २५ जणांनी रक्तदान केले. २७ तारखेला धाड (ता. बुलढाणा) येथे ३२ तर वाळूज औरंगाबाद येथे १२ जणांनी, २८ ला नांद्राकोळीत ३३ दात्यांनी रक्तदान केले. १ मार्चला मोताळा येथे ७६, माहोरा जिल्हा जालना येथे ५२ तर देऊळगाव राजात २४ दात्यांनी रक्तदान केले. आज मेरा बुद्रूक, शेंदूरणी, देऊळगाव शाकरशा, रायपूर तर जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे शिबीर पार पडले.

हेही वाचा >>> कसब्यातील पराभवावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

सामाजिक बांधीलकीला प्राधान्य दरम्यान शाहू परिवाराचे संदीप शेळके व मालती शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की, संस्थेने आर्थिक व्यवहाराला नेहमीच सामाजिक बांधीलकीची जोड दिली आहे. रक्तदानाचा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. यातून किमान एक हजार रक्त बाटल्या संकलनाचे उद्दिष्ट असून आजअखेर सुमारे पावणे चारशे बाटल्या संकलित करण्यात आल्या आहे. यामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे संदीप शेळके यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajarshi shahu multistate co op credit society ltd organized blood donation camp at 75 places in the state scm 61 zws