rajya bal natya spardha results: १८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत नागपूरच्या अश्वघोष कला अकादमीच्या ‘थेंब-थेंब श्वास’ या नाटकाला निर्मितीचे द्वितीय आणि इतर सहा असे एकूण सात पुरस्कार मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युवा प्रबोधन बीड संस्थेच्या ‘प्रायश्चित’ ला प्रथम तर अहमदनगरच्या सप्तरंग थिएटर्सच्या ‘मी तुझ्या जागी असते’ या नाटकाला तृतीय पुरस्कार मिळाला. सोलापूर येथे झालेल्या १८ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. नागपूरच्या अश्वघोष कला अकादमीच्या ‘थेंब-थेंब श्वास’ला निर्मितीचा दुसरा पुरस्कार मिळाला.

याशिवाय नाट्यलेखनासाठी वीरेंद्र गणवीर (द्वितीय पुरस्कार), दिग्दर्शनासाठी रिशील ढोबळे (द्वितीय), नेपथ्यासाठी श्रेयश अतकर (प्रथम पुरस्कार), प्रकाश योजनेसाठी देवदत्त सिद्धाम (प्रथम पुरस्कार) तर अभिनयासाठी दीपांशी मुरमाळे (रौप्य पदक), वृषाली सहारे (तसेच अभिनयासाठी प्रमाणपत्र) असे सात पुरस्कार मिळाले असून राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथमच नागपूरने मोहोर उमटवली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya bal natya spardha 2022 themb themb swash from nagpur won 7 prices scsg