वर्धा : पक्षीय चिन्हावर लढल्या जात नाही म्हणून बाजार समित्यांच्या निवडणुकीत विविध आघाड्यांना उधाण आले आहे. हिंगणघाट व समुद्रपूर बाजार समितीत असे चित्र असून, मधूर संबंध संपुष्टात आल्याची स्थिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार रणजीत कांबळे यांनी भाजपा आमदार समीर कुणावार यांच्यासोबत प्रचाराचा नारळ फोडला. कुणावार, कोठारी व कांबळे एकत्र आले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजू तीमांडे, ठाकरे गट सेना व चारुलता टोकस यांचा काँग्रेस गट एकत्र आले. टोकस यांनी भाऊ रणजीत कांबळे यांच्या उमेदवाराविरोधात सभा घेत आलबेल नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा – विदर्भ, मराठवाड्यातील दुग्ध प्रकल्प; गडकरींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय ठरले?

कोणाचीही भीती बाळगू नका. आम्ही सोबत आहोत, असे टोकस म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर कोठारी यांचे बाजार समित्यांवर नेहमी वर्चस्व राहले आहे. पण यावेळी विचित्र आघाड्या झाल्याने संशयकल्लोळ आहे. पण आजवर पडद्यामागे चर्चेत असलेले कांबळे व टोकस वैर आता प्रथमच उघड झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranjit kamble and charulata tokas against each other in hinganghat bazar committee election pmd 64 ssb