नागपूर : अश्लील गाणे गायल्याचा आरोप करीत प्रसिद्ध गायक व रॅपर बादशाह उर्फ आदित्य प्रतीकसिंह सिसोदियाविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना बादशाहने एकदाही हजेरी लावली नाही. आता त्याला उत्तर देण्याची अंतिम संधी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एस. जाधव यांनी दिली आहे. अन्यथा, त्याची बाजू न ऐकताच निकाल दिला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाचपावली पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोघांच्या आवाजाचे नमुने पोलिसांना घ्यायचे आहेत. प्रसिद्ध गायक हनी सिंग यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. मात्र, बादशाहचे नमुने मिळाले नाहीत. त्याच्या आवाजाचे नमुने घ्यावेत यासाठी तक्रारकर्ते आनंदपाल सिंग गुरुपालसिंह जब्बाल यांनी त्यांचे वकील रसपाल रेणू यांच्यामार्फत अर्ज केला आहे.

हेही वाचा – ‘स्तनदा मातेच्या दुधाची बँक’ नवजातांसाठी संजीवनी ठरेल; वनामतीच्या संचालक मिताली सेठी यांचा विश्वास

हेही वाचा – भंडारा : ऐकावे ते नवलच! गावाचे नाव पन्नाशी, पन्नास घरं अन् सर्वांचे आडनाव एकच; वाचा अजब गावाची गजब कथा

सुनावणीत बादशाहच्या वकिलांनी तक्रारीची प्रत मागितली होती. मात्र, बादशाहने आतापर्यंत अनेक वकील बदललेत. यापूर्वी त्याला तक्रारीची प्रत देण्यात आली होती. हा वेळकाढूपणा असल्याचा युक्तिवाद रेणू यांनी केला. यावर न्यायालयाने बादशाहचा अर्ज फेटाळला. तसेच आवाजाच्या नमुन्याबाबत तक्रारकर्त्याने सादर केलेल्या अर्जावर उत्तर देण्याची अंतिम संधी दिली. बादशाहने सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीदरम्यान उत्तर न दिल्यास त्याच्याविरुद्धच्या अर्जावर त्याची बाजू न ऐकताच निकाल दिला जाईल, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rapper badshah ordered to attend court for song case by nagpur court dag 87 ssb