कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई रोज उठून महाराष्ट्राच्या कानफडात मारतात आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत येतात, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली होती. दरम्यान, राऊतांच्या या टीकेबाबत टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची पुन्हा एकदा जीभ घसरल्याचे बघायला मिळालं. संजय राऊत हा पिसाळलेला कुत्रा आहे, असं वादग्रस्त विधान त्यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “बोम्मई रोज कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत…”, संजय राऊतांचं टीकास्र; शिंदे-फडणवीसांना केलं लक्ष्य!

काय म्हणाले संतोष बांगर?

“संजय राऊत हा पिसाळलेला कुत्रा आहे. त्याच्या कानशिलात वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तो आमच्या नेत्याबद्दल असं विधान करत असेल, तर ज्या ठिकाणी तो मिळेल, त्याठिकाणी त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही”, असं प्रत्युत्तर संतोष बांगर यांनी दिले आहे. “महाविकास आघाडीकडे टीका करण्याशिवाय दुसरं काहीही उरलेलं नाही, त्यामुळे त्यांना टीका करू द्या, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – आमदार संतोष बांगरांकडून हिंगोलीतील प्राचार्यांना मारहाण; दीपक केसरकर म्हणाले, “बांगर साहेबांनी आता…”

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सीमाप्रश्नावरून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. “एक इंचही जमीन देणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जागांवरचा हक्क सोडणार नाही असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात. इतकी बेअब्रू महाराष्ट्राची गेल्या ७० वर्षांत कधी बाजूच्या राज्यांनी केली नव्हती. सीमाप्रश्न जरी जुना असला, तरी एकमेकांच्या राज्याविषयी आदर ठेवून हा संघर्ष सुरू होता. दोन्ही राज्य एकाच देशाचे घटक आहेत. तरी बोम्मईंची भाषा अशी आहे. दोन्हीकडे भाजपाचे नेते आहेत. तरी रोज उठून बोम्मई महाराष्ट्राच्या कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे”, असं ते म्हणाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh bangar replied to sanjay raut after criticism of eknath shinde on maharashtra karnatak border issue spb