scorecardresearch

आमदार संतोष बांगरांकडून हिंगोलीतील प्राचार्यांना मारहाण; दीपक केसरकर म्हणाले, “बांगर साहेबांनी आता…”

शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झालेले आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

आमदार संतोष बांगरांकडून हिंगोलीतील प्राचार्यांना मारहाण; दीपक केसरकर म्हणाले, “बांगर साहेबांनी आता…”
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झालेले आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावरून विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आहे. दरम्यान, आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही प्रतिक्रिया दिली. मुंबई आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा – “संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा, दिसेल तिथे…”, संतोष बांगर यांचं वादग्रस्त विधान

काय म्हणाले दीपक केसरकर?

“या प्रकरणी गृहमंत्रालय योग्य ती कारवाई करेल. आच्यासाठी खासदार, आमदार आणि सर्वसामान्य नागरीक सारखेच आहेत. संतोष बांगर यांनी थोडा संयम राखला पाहिजे. ते हे एका पक्षाचे आमदार आहेत. अशा घटनांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते, हे मला मान्य आहे. आम्ही त्यांच्याशी याविषयी चर्चा करू”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.

हेही वाचा – आमदार बांगर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; हिंगोलीतील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

अशाप्रकारे मारहाण करणं अयोग्य

“संतोष बांगर हे आक्रमक आमदार आहेत. ते जे काही करतात, त्यांच्यामागे एक कारण असते. मागे एकदा शालेय पोषण आहारात अळ्या साडपल्या होत्या. तेव्हा त्यांनी अशा प्रकारं वर्तन केलं होतं. आताही अशाच प्रकारे काही तरी कारण असेल. मात्र, कारण कोणतंही असो, अशा प्रकारे कोणाला मारहारण होता कामा नये. यासाठी कायदा आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “…अन्यथा रट्टे देईन”, संतोष बांगर यांची पुन्हा शासकीय कर्मचाऱ्याला दमदाटी

नेमकं काय आहे प्रकरण?

आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. महत्त्वाचं म्हणजे बांगर यांच्याबरोबच त्यांच्या कार्यकर्त्यांनीही याप्राचार्यांना मारहाण करताना या व्हिडीओतून दिसून येत आहे. दरम्यान, बांगर यांनी नेमकी मारहाण का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून ही घटना १८ रोजी घडल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 13:24 IST

संबंधित बातम्या