नागपूर: स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे हे प्रत्येकाचे स्पप्न असते. परंतु अनेक वर्षे प्रयत्न करूही यश मिळत नाही. परंतु घरची परिस्थिती नसतानाही अनेक काळ परिश्रम करून यश मिळवणारे उदाहरण आपल्यासमोर आहेत. त्यांचे स्पर्धा परीक्षेचे संघर्ष अनेकांना प्रेरणा देऊन जाणारे असते. अशाच एक विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक वर्षे परिश्रम करून मिळवलेले यश हे आता अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. काय आहे या विद्यार्थिनीची कहाणी नक्की वाचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्थिक परिस्थितीमुळे पाचवीपर्यंतच शिकलेल्या ज्योतिराम भोजने यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सोलापूर शहरात छोटे गॅरेज सुरू केले. वडिलांचे कष्ट व त्यांच्या जिद्दीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सोलापुरातील गवळी वस्तीमधील गलिच्छ वस्ती सुधारमधील पत्र्याच्या घरात राहणाऱ्या ज्योतिराम यांच्या दोन्ही मुलींनी ‘एमपीएससी’च्या परीक्षेत यश मिळविले. वडील ज्योतिराम भोजने यांना कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे पुढे शिक्षण घेता आले नाही. गॅरेजमधून मिळणाऱ्या चार पैशांतून त्यांनी संसार सुखाचा केला. मुलांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम  केले. अनेक अडचणी आल्या, पण मुलींचे शिक्षण थांबविले नाही. सरोजिनी व संजीवनी यांनी बी ए झाल्यावर २०१८ पासून ‘एमपीएससी’ची तयारी सुरू केली. कोरोना काळात परीक्षा होऊ शकल्या नाहीत, तरीपण त्यांनी अभ्यासाची कास सोडली नाही. अखेर तो दिवस उजाडला आणि पत्र्याच्या खोलीत गॅरेज चालवून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या ज्योतिराम भोजने यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

एमपीएससीचा निकाल जाहीर झाला आणि त्यात दोन्ही मुली उत्तीर्ण झाल्याची बातमी त्यांच्या कानावर पडली. ‘एमपीएससी’चा अभ्यास करताना अनेक अडचणींचा सामना केला. पुण्याला परीक्षेला जायच्या वेळी मावस भाऊ प्रशांत शिवाजी बचुटे यांनी आर्थिक मदतीबरोबर मानसिक आधारसुद्धा दिला. करोनात घरजागा अपुरी पडू लागल्यामुळे वडिलांचे मित्र ब्रह्मदेव खटके यांनी त्यांच्या खोल्या अभ्यासासाठी मोफत दिल्या. आई रेश्मा, भाऊ श्रीनिवास, आजी तारामती यांनीही प्रोत्साहन दिल्याचे त्या दोघी बहिणींनी आवर्जून सांगितले पालकांची खंबीर साथ असेल तर पदवीप्राप्त मुलींना स्पर्धा परीक्षा हा करिअरचा मोठा पर्याय उपलब्ध असल्याचेही त्या म्हणाल्या.

सात परीक्षांमध्ये थोडक्यात अपयश, पण जिद्द कायम

संजीवनी आणि सरोजिनी या दोघी सख्या बहिणींनी सात वर्षांत ‘एमपीएससी’च्या एकूण सहा मुख्य परीक्षा दिल्या, परंतु त्यांना काही गुणांमुळे यश मिळू शकले नाही. मात्र, दोघी बहिणींनी जिद्द न सोडता अभ्यास सुरूच ठेवला. वय वाढत असताना आई-वडिलांनाही दोन्ही मुलींवर विश्वास होता म्हणून सात परीक्षांमध्ये थोडक्यात अपयश आहे. पण जिद्द कायम ठेवत अपयशाला मात दिली. संजीवनी आणि सरोजिनी या दोघी सख्या बहिणींनी सात वर्षांत एमपीएससीच्या एकूण सहा मुख्य परीक्षा दिल्या. परंतु त्यांना काही गुणांमुळे यश मिळू शकले नाही. मात्र, दोघी बहिणींनी जिद्द न सोडता अभ्यास सुरूच ठेवला. वय वाढत असताना आई-वडिलांनाही दोन्ही मुलींवर विश्वास होता म्हणून त्यांनी विवाहाची घाई केली नाही. आई-वडिलांचा विश्वास त्यांनी सार्थ ठरविला आणि दोघींनीही एमपीएससीत यश मिळविले. संजीवनीला मंत्रालयात महसूल विभागात लिपिक म्हणून नेमणूक मिळणार आहे. तर सरोजिनीला महसूल साहाय्यक आणि कर साहाय्यक अशा दोन्ही पदांसाठी निवड झाली असून तिची कर साहाय्यक म्हणून काम करण्याची इच्छा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sisters sanjeevani and sarojini bhojane succeed in mpsc in their seventh attempt in nagpur dag 87 amy