लोकसत्ता टीम
वर्धा : आज राज्यभरात नामवंत असलेल्या गायकांच्या पहिल्या संधीचा पाळणा हललेल्या स्वरवैदर्भी या विख्यात सिनेगित गायन स्पर्धेचा बिगूल वाजला आहे. सावंगी येथील दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचा श्री गणेश सांस्कृतिक महोत्सवात या विदर्भास्तरीय स्पर्धेचे आयोजन केल्या जाते.
आणखी वाचा-बोगस बियाणे! पाऊण कोटी रुपये किमतीच्या कृषी निविष्ठावर बंदी; भरारी पथकांची छापेमारी
स्पर्धेच्या गत एकवीस वर्षात वैशाली माडे, धनश्री देशपांडे, रसिका चाटी, अभिषेक मारोटकर, नितीन वाघ,श्रुती जैन व मान्यवर झालेल्या गायकांना इथेच प्रथम बहुमान प्राप्त झाला. स्पर्धा १७ सप्टेंबरला होणार असून १४ सप्टेंबरपर्यंत प्रवेशपत्र भरायचे आहे. संगीतकार मदन मोहन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त द्वितीय फेरी ‘यादे मदन मोहन’ म्हणून घेण्यात येत आहे. एकूण ७५ हजार रुपयांची रोख बक्षिसे आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितकुमार वाघमारे यांनी नोंदणी करण्यासाठी संयोजक संजय इंगळे तिगावकर (९७६५०४७६७२ ), अभय जारोंडे ( ९७६५४०४०४८), तसेच सुनील रहाटे ( ९९२१२८७४०८) यांच्याशी संपर्क करण्याची विनंती केली आहे.
