वर्धा: मां जिजाऊ, शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी यांचे लक्षवेधी स्मारक येथील धूनिवाले मठ परिसरात लावण्यात आले आहे. पण याच ठिकाणी या तिघांचेही शिल्प लावण्याचे आश्वासन त्यावेळीच देण्यात आले होते. अद्याप त्याबाबत हालचाल नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठा महासंघ व जिजाऊ स्मारक समितीने ही बाब अनेकवेळा लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासन यांच्याकडे निदर्शनास आणली. असे का, अशी विचारणा करीत स्मारक समितीने शासनाचा या शिल्पाबाबत सापत्नभाव दिसून येत असल्याचा आरोप केला.

हेही वाचा… वर्धा : पक्ष्यांची घरटी पाडली, अधिकाऱ्यांविरोधात तक्रार झाल्याने पंचनामा

शासन उदासीन असल्याने २६ जूनपासून स्मारका पुढे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा निर्धार समितीने व्यक्त केला. समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण जगताप, शैलजा साळुंके, प्रा.उमाकांत डुकरे, तुषार देवढे, राजेश वाकडे, नरेश शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनास भावना कळविल्या असल्याचे नमूद करण्यात आले. शिवप्रेमींनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The maratha federation and the jijau memorial committee expressed their determination to start a hunger strike in wardha pmd 64 dvr