बुलढाणा: बुलढाणा शहरातील कुख्यात गुंड बाब्याची तिघांनी जुन्या वैमानस्यातून तिघांनी निर्घृण हत्या केली.  बाब्या काहीसा गाफिल असल्याची संधी हेरून त्याच्या मागावर असलेल्या तिघा मित्रांनी त्याच्यावर सामूहिक हल्ला चढवीला त्याला प्रतिकारची संधी न देता त्याच्यावर लाकडी दांडका व चाकूने हल्ला चढवून त्याला ठार केले. बाब्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर आणि तो मेल्याची खात्री करून तिघा  हल्लेखोरांनी पळ काढला. आज शनिवारी उत्तरंरात्री बुलढाणा तालुक्यातील सैलानी दर्गा परिसरात हा थरारक  व तितकाच खळबळ जनक घटनाक्रम घडला. काल शुक्रवारी आलेल्या अमावस्या निमित्त  सैलानी  दर्गा येथे छोटेखानी जत्रा भरते. तसेच दूरवरचे मनोरुग्ण व बाधा झालेले व्यक्ति उपचार साठी  सैलानी येथे येतात. यामुळे अस लेल्या  गर्दीचा मारेकर्यांनी लाभ घेतला मात्र पोलिसांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरवून तिन्ही आरोपीच्या मुसक्या आवळत त्यांना अटक केली आहे.

शेख हाफिज शेख नफिज उर्फ ‘बाब्या’ (वय ३८, राहणार इंदिरानगर, बुलढाणा) असे हत्या करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. सैलानी येथे अमावास्येनिमित्त भरणाऱ्या छोटेखांनी यात्रेत धारदार चाकूने निघृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून झालेल्या या खूनप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना शुक्रवारी ,२२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या आसपास सैलानी बाबा दर्गा परिसरात घडली. अमावास्येनिमित्त सैलानीत नेहमीप्रमाणे यात्रा भरली होती. मृतक बाब्या देखील आपल्या साथीदारांसह यात्रेत आला होता, दरम्यान, गर्दीचा फायदा घेत आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार केले, यात बाब्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत तिघांना अटक केली आहे. यामध्ये अलेक्स इनॉक जोसेफ उर्फ रोनी (रा. सैलानी), शेख सलमान शेख अश्फाक (रा. सैलानी), सय्यद वाजीत सय्यद राजू उर्फ वाजीत टोपी (रा. सैलानी) यांचा समावेश आहे. तिन्ही आरोपीविरुद्ध

तिघांविरोधात रायपूर पोलिस ठाण्यात  भारतीय न्याय संहितेच्या  कलम  १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतक शेख नफिज उर्फ बाब्या हा जेबकटरीसह मारहाणीच्या अनेक प्रकरणांत आरोपी होता, त्याला काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी तडीपारही केले होते. तरीही तो शहरात वावरत होता. त्याच्या हत्येमुळे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास रायपूर पोलिस करीत आहेत. घटना स्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केली.