लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा: उन्हाळी सुट्टीत मुलाबाळांसह सहलीस निघण्याचा बेत आखण्याचे हे दिवस. ट्रॅव्हल्स कंपन्या ग्राहक हेरण्यासाठी टपूनच बसल्या असतात. मात्र, त्यांनीच फसवणूक केली तर करायचे काय, असा प्रश्न पोलिसांकडे दाखल तक्रारीतून पुढे आला.

बोरगाव येथील मनोज कोळणुरकर यांनी शिमला, मनालीसाठी ‘ड्रीम हॉलिडेज’ या कंपनीकडे प्रतिदाम्पत्य सोळा हजार चारशे रुपये या दराने दोन दाम्पत्यांचा प्रवास बुक केला. मात्र पर्यटनाला निघण्याच्या दोन दिवसांपूर्वी आरोपी शैबा बीन हक यांनी अकरा हजार रुपयाची अतिरिक्त मागणी केली. ते न भरल्यास टूर रद्द करण्याचे धमकावले.

हेही वाचा… अकोला परिमंडळात वीजचोरांना महावितरणचा शॉक; ९२ जणांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल

शेवटी मनोज यांनी ती रक्कम नमूद खात्यावर पाठविली. दाम्पत्य दिल्लीत पोहचले. तिथे त्यांनी शैबा यांना फोन केला. मात्र प्रतिसाद मिळालाच नाही. अन्य एका महिलेने फोन उचलला मात्र लगेच ठेवून दिला. शेवटी दाम्पत्य कसेबसे मनाली येथे पोहचले. तिथून परत फोन केल्यावर शैबा यांनी पैसे परत करण्यासाठी वेळ मागितला. मात्र या कथित ट्रॅव्हल्स कंपनीने अद्याप पैसे परत केले नाही. कंटाळून मनोज यांनी शहर पोलीसांकडे धाव घेतली. फसवणूक प्रकरणी शैबा तसेच फरात जहान यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourist cheated in the name of travel company in wardha pmd 64 dvr