लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर: विद्युत खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित – भंजारी मार्गावर घडली. या घटनेत दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. मिथुन पांडुरंग मडावी, अंकुश राजू गंदेरशीरवार अशी मृतांची नावे आहेत. सुभाष रणदिवे, ईश्वर मांडवकर हे दोघे जखमी झाले. सर्व मजूर मूल तालुक्यातील केळझर येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी पोहोचले.

ट्रॅक्टरखाली दबलेल्या दोघांनाही बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी असलेल्यांना दोघांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळेस हे चौघेही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर बसले होते.

हेही वाचा… नागपूर : खाटेवर रुग्ण ठेवून युवक काँग्रेसचे रुग्णालयासाठी आंदोलन

विशेष म्हणजे, ट्रॉलीला नंबर प्लेटच नव्हती. पोलीस विभागाच्या दुर्लक्षाचा फायदा घेऊन शेती कामासाठी घेतलेल्या बहुतांश ट्रॅक्टरमधून जड वाहतूक केली जाते. यामुळे अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two laborers died after tractor overturned in chandrapur rsj 74 dvr