नागपूर : वेगवेगळ्या घटनांमध्ये महामार्गावर निष्काळजीपणे पार्क केलेल्या ट्रकांवर आदळून दोघांचा मृत्यू झाला. पहिली घटना कोराडी मार्गावर घडली. संजय ज्ञानलाल धुर्वे (३०) रा. वेकोलि कॉलनी, वलनी, असे मृताचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास संजय हे त्यांचा मित्र मनीष रॉय यांच्यासोबत एमएच-४०/वाय-७६७५ क्रमांकाच्या ट्रकने नागपूरकडून सावनेरकडे जात होते. ईडन गार्डन रेस्टॉरेंटसमोर ट्रक क्र. एमएच-४०/एन-७५८५ च्या चालकाने त्याचा ट्रक निष्काळजीपणे रस्त्यावरच उभा केला होता. ट्रकचे रिफ्लेक्टर आणि मागील लाईट (रिफ्लेक्टर) बंद होता. अशात संजय यांचा ट्रक रस्त्यावर उभ्या ट्रकवर जाऊन धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यांचा समोरचा कॅबिन पूर्णत: चक्काचूर झाला होता. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. गंभीर जखमी संजय यांना कॅबिनच्या बाहेर काढून उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हेही वाचा – सरकारकडून मराठा समाजाचा विश्वासघात, जुनेच नियम शब्दच्छल करीत कायम; काँग्रेसचा आरोप, म्हणाले, “अधिनियम २००० मधीलच…”

हेही वाचा – दोन भावांसाठी मित्र ठरला कर्दणकाळ; एकाचा गेला जीव, दुसरा गंभीर जखमी

अशाच प्रकारच्या अपघाताची दुसरी घटना वर्धा मार्गावर घडली. राजेश बुंदेलाल पराते (२७) रा. हनुमाननगर, बुटीबोरी, असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास राजेश त्यांच्या एमएच-४०/बीक्यू-६४११ क्रमांकाच्या मोटारसायकलने नागपूरवरून बुटीबोरीकडे जात होते. डोंगरगाव बाजाराजवळ ट्रेलर ट्रक क्र. एमएच-४०/सीएम-३९२८च्या चालकाने त्याचे वाहन रस्त्यावरच पार्क करून ठेवले होते. ट्रकचा टेल लाईट बंद होता. रिफ्लेक्टरही लागलेले नव्हते. त्यामुळे रोजशला समोर उभा ट्रक दिसला नाही. त्याची मोटारसायकल ट्रकवर जाऊन आदळली. यात घटनास्थळावरच राजेशचा मृत्यू झाला. पोलिसांनी राजेशचा मित्र मिलिंद वानखेडेच्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालकावर गुन्हा नोंदविला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two person died after colliding with carelessly parked trucks on highway adk 83 ssb
First published on: 28-01-2024 at 13:24 IST