नागपूर : उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गेले असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी यातून बाहेर पडावे. ज्याला घर सांभाळता येत नाही ते कधीच मोठे होऊ शकत नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यामुळे ते नैराश्यात आहे. ते त्याच मानसिकत बोलत आहेत. फडणवीस यांनी गुरुवारी पौराणिक ग्रंथाचे दाखले दिले. त्यात सत्यता आहे. शिंदे यांनी खातेवाटप समन्वयाने केले. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. खाते वाटपाआधीही ते कुठल्याही विभागाची बैठक घेऊ शकतात.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-07-2023 at 19:44 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray post of chief minister is in depression bawankule criticism of uddhav thackeray vmb 67 ysh