नागपूर : शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी ही मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडे लागले आहे.

हेही वाचा – हे गणराया, भाजपा नेत्यांना सुबुद्धी दे – खासदार सुप्रिया सुळे

संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे ही मागणी विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केलेली आहे.

हेही वाचा – वेबसिरीजमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने अभिनेत्रीची ऑनलाइन फसवणूक

विधानसभा अध्यक्ष ही मागणी मान्य करून आपल्या पारदर्शक कारभाराचा परिचय देतील ही आशा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay vadettiwar demand to hear the case of disqualified mla in shivsena through online live broadcast rbt 74 ssb
First published on: 23-09-2023 at 11:53 IST