scorecardresearch

Premium

हे गणराया, भाजपा नेत्यांना सुबुद्धी दे – खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे आज सकाळी दर्शन घेतले आणि आरतीदेखील केली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडींवर भाष्यदेखील केले.

Supriya Sule visited Kasba Ganapati
हे गणराया, भाजपा नेत्यांना सुबुद्धी दे – खासदार सुप्रिया सुळे (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

पुणे : आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होऊन पाच दिवस झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक गणेश मंडळांना विविध क्षेत्रांतील मंडळी भेट देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे आज सकाळी दर्शन घेतले आणि आरतीदेखील केली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडींवर भाष्यदेखील केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशात महागाई वाढली, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या, तरुणांना रोजगार नाही. या सर्व बाबींवर उपाय योजना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. काल महिला आरक्षणाचे विधेयक संसदेत मंजूर होत होते. त्यावेळी खासदार कनीमोळी यांच्याविरोधात भाजपाच्या एका खासदाराने अपशब्द वापरले. ही बाब निषेधार्थ असून एका बाजूला महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर होत आहे, तर दुसर्‍या बाजूला महिला खासदाराचा अपमान करण्याचे पाप भाजपा नेत्याने केले. यातून भाजपाची मानसिकता दिसून येते. त्यामुळे हे गणराया भाजपा नेत्यांना सुबुद्धी दे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Sharad Pawar Eknath Shinde Ajit Pawar
बंडानंतर धनुष्यबाण शिंदे गटाला, आता घड्याळ कुणाला मिळेल? दिल्लीत एकनाथ शिंदे म्हणाले…
Vijay Wadettiwar
“दोन माणसं भाजपाबरोबर गेली तरी त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळेल, कारण…”, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य
BJP ramesh Bidhuri
महिला आरक्षण विधेयकाचा विजयोत्सव भाजपा खासदाराच्या अश्लाघ्य विधानामुळे काळवंडला
Mk Stalin Udaynidhi k ponmudi
‘इंडिया आघाडी सनातन धर्माच्या विरोधातच’, उदयनिधी यांच्यानंतर द्रमुकच्या मंत्र्यांवर भाजपाची टीका

हेही वाचा – देखावे पाहण्यासाठी आजपासून गर्दी; पुण्यातील ‘हे’ प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर होणार बंद

हेही वाचा – पिंपरी : गणेश मंडळांच्या आरती…अजित पवार आणि रोहित पवार दाखविणार शक्ती!

देशात आणि राज्यात यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे, हीच गणरायाकडे प्रार्थना करीत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supriya sule visited kasba ganapati criticized bjp svk 88 ssb

First published on: 23-09-2023 at 11:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×