scorecardresearch

Premium

वेबसिरीजमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने अभिनेत्रीची ऑनलाइन फसवणूक

वेबसिरीजमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने एका महिला अभिनेत्रीची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

actress cheated online in pune, pune actress cheated, actress cheated with the lure of webseries
वेबसिरीजमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने अभिनेत्रीची ऑनलाइन फसवणूक (संग्रहित छायाचित्र)

पुणे : वेबसिरीजमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने एका महिला अभिनेत्रीची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका अभिनेत्रीने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार अभिनेत्री सिंहगड रस्ता भागात राहायला आहे. अभिनेत्री एका समाजमाध्यमातील समूहात सदस्य आहे.

हेही वाचा : देखावे पाहण्यासाठी आजपासून गर्दी; पुण्यातील ‘हे’ प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर होणार बंद

kannada actor Nagabhushana rams car into couple in bengaluru
प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारने फुटपाथवरून चालणाऱ्या जोडप्याला दिली धडक; महिलेचा मृत्यू, पतीची प्रकृती चिंताजनक
Censor Board reaction on actor Vishal allegations about corruption in CBFC
“एजंटच्या माध्यमातून…”, तामिळ अभिनेत्याच्या लाचखोरीच्या आरोपांवर सेन्सॉर बोर्डाचे उत्तर
woman raped in pune after being given spiked drink
शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन महिलेवर बलात्कार
Nusrat Jahan
Nusrat Jahan : खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ ईडी कार्यालयात दाखल, फ्लॅट विक्री फसवणूक प्रकरणी चौकशी

चोरट्याने काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. हैद्राबाद येथे एका वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू आहे. वेबसिरीजसाठी ऑडिशन द्यावी लागेल, असे चोरट्याने तिला सांगितले. पुणे ते हैद्राबाद विमान तिकिटाचे पैसे ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागतील, असे सांगून अभिनेत्रीकडून चोरट्याने १६ हजार ५६० रुपये घेतले. त्यानंतर चोरट्याने तिला तिकिट पाठविले नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune actress cheated online with the lure of getting job in webseries pune print news rbk 25 css

First published on: 23-09-2023 at 11:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×