भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी करा, अशी मागणी केली होती. तर चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यात मुख्य भूमिका असलेले महाविकास आघाडी सरकारचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातच दारूबंदी करावी, अशी मागणी केली आहे. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष यांच्या कार्यालयात भारत जोडो यात्रेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- गडचिरोली : मंत्री संजय राठोड प्रकरणी न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार; चित्रा वाघ यांची स्पष्टोक्ती

चित्रा वाघ यांनी चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी करा, अशी मागणी केली होती हे निदर्शनास आणून दिल्यानंतर वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातच दारूबंदीची मागणी चित्राताई यांनी करावी असा सल्ला दिला. उद्योग राज्यातून पळवले जात आहेत. पाच मोठे उद्योग राज्यातून गेल्याने पाच लाख युवकांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे उद्योगही राज्यात आणावे, असेही वडेट्टीवार म्हणाले. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुगंटीवार यांच्यावरही टीका केली.

‘काळ्या म्हशीने गायीला काळी म्हणण्यासारखा हा प्रकार’

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत भ्रष्टाचाराचा पैसा आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना वडेट्टीवार यांनी काळ्या म्हशीने गायीला काळी आहे, असे म्हणण्यासारखा हा प्रकार असल्याचे सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwars demand to ban alcohol in entire maharashtra dpj