गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तहसील मुख्यालयापासून सुमारे ७ कि.मी. अंतरावर असलेल्या सिवनी आणि जवरी गावात ॲनाकोंडा सदृश महाकाय अजगर गेल्या २-३ महिन्यांपासून गावातील सायफन नाल्याजवळ तळ ठोकून आहेत. अनेकांनी हे स्पष्टपणे पाहिले आहे आणि आतापर्यंत त्यांनी तीन शेळ्याना आपले शिकार बनवले आहे. यामध्ये जवरी येथील रहिवासी इमलाबाई येटरे, धनलाल येटरे आणि कुंताबाई भांडारकर यांच्या मालकीच्या शेळ्यांचा समावेश आहे. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभागालाही दिली आहे. मात्र आजपर्यंत विभागाचे कोणीच फिरकले नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समन्वयादरम्यान गावातील एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले की, हा अजगर एवढा मोठा आहे की तो एखाद्या नागरिकालाही आपला बळी बनवू शकतो, त्यामुळे या अजगरांची तातडीने विल्हेवाट लावण्याची मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे. जेणेकरून अशा घटना टाळता येतील. या संदर्भात आमगाव चे वनपरिक्षेत्र अधिकारी रविकमल भगत यांच्याशी चर्चा केली असता, वनविभागालाही माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वन विभागातील एक-दोनदा कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन या अजगर ला पकडण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा… सहकारी संस्था अवसायनात काढण्यास स्थगिती; सहकार मंत्री वळसे पाटील यांची स्पष्टोक्ती, शेतकरी आत्महत्या…

मात्र ड्रेनेज पाईपचा आकार लहान असल्यामुळे ते आत शिरतात. वनविभागाचे कर्मचारी ४ ऑक्टोबर रोजी घटनास्थळी गेले होते. विभागाचे कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून असून त्यांना लवकरात लवकर जाळ्यात अडकवून त्यांना सुरक्षित स्थळी नेऊन सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून या परिसरातील नागरिकांना सुरक्षितता वाटेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villagers are in danger due to giant anaconda like python has been seen near the siphon drain in the sivani and javari village gondia sar 75 dvr