नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी कळमना मार्केट परिसरात येत्या ४ जूनला केली जाणार असून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शुक्रवारी  तयारीचा आढावा घेतला. कळमना मार्केट मधील व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाला आजवर कोणतीही बाधा येऊ न देता जिल्हा प्रशासन मतमोजणी केंद्राच्या उभारणीच्या कामे करीत आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी  कळमना मार्केटला भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधत मतमोजणी केंद्राच्या पाहणी व सुरक्षिततेचा आढावा घेतला. अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> १८ वाघ.. सहा बिबट अन्  बुद्धपोर्णिमेच्या रात्रीचा थरार

येत्या ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीत प्रारंभी पोस्टल बॅलेटची मतमोजणी होणार आहे. ५०० बॅलेट पेपरसाठी एक टेबल याप्रमाणे १० टेबल १० अधिकारी राहणार आहेत. यावर सहाय्यक निवडणूक अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. १२० टेबलवर मतमोजणी मतयंत्र मतमोजणीसाठी नागपूर लोकसभेसाठी १२० टेबल व रामटेकसाठी १२० टेबल या प्रमाणे मतमोजणीची रचना करण्यात आली आहे. राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया पाहता यावी यासाठी नियोजन केले आहे. दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी एकूण सुमारे सहा हजार एवढे मनुष्यबळ कार्यरत राहील. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरिक्षणाखाली ही प्रक्रिया पार पडेल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Votes counting of nagpur and ramtek lok sabha elections in kalamna market yard on 4 june rbt 74 zws