वर्धा : लोकसभा निवडणूक म्हणजे केवळ दर्शनी प्रचार, भाषणे, आरोप-प्रत्यारोप, सभा, मतदान, जय-पराजय एवढेच. अशी माहिती प्रामुख्याने सामान्य जनतेस असते. पण हे सर्व काम स्वतः देखरेख ठेवून पार पाडणारी यंत्रणा कोणाच्या खिजगिनतीत पण नसते. ते त्यांचे कामच, असे उमेदवारांसह सर्व म्हणतात. मतदान करता न आल्यास याच निवडणूक अधिकारी वर्गास लाखोली वाहल्या जाणे नवे नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदानाच्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता मतदानची रंगीत तालीम होती. तेव्हा पहाटे पाचपासून जिल्हा निवडणूक कार्यालय म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय सक्रिय झाले. सायंकाळी सहा म्हणजे मतदान होईपर्यंत थेट जबाबदारी या ४० अधिकारी, कर्मचाऱ्यांवार होती. या काळात इथेच जेवन, चहा, नैसर्गिक विधी, असे सोपस्कार करणे भाग पडले. दर दोन तासांनी टक्केवारी देणे, सगळ्या पोलिंग टीम आल्याची माहिती, सतत वेब कास्टिंग तपासणी, रात्री मतदान येंत्रे येण्याची वाट, दुरवर मोर्शीपासून ती आल्यावर रात्री दोन वाजेपर्यंत छाननी. सकाळी सातपर्यंत मतदान व टक्केवारीचा हिशेब चालला. त्यानंतर आता हे सर्व स्ट्रॉंग रूम असलेल्या अन्न महामंडळाच्या गोदामात बसले आहेत. या ३० तासात कुणीही घरी गेले नाहीत.

हेही वाचा : अकोल्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ, एकूण अंतिम मतदान ६१.७९ टक्क्यांवर

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले म्हणतात, आज फोन घेणे शक्य नाही. कृपया उद्या बोलू. कारण आता या सर्व मतदान यंत्राची तपासणी, मतांची गोळबेरीज, अधिकृत मतदान टक्का जाहीर करणे, त्यांची व्यवस्था लावणे, सुरक्षा आणि नंतरच घर गाठने. या काळात डोळे क्षणभर मिटायलाही वेळ मिळाला नसल्याचे एक निवडणूक अधिकारी रासपायले सांगतात. आहे त्याच ड्रेसमध्ये आलो तेव्हापासून कार्यरत राहणे गरजेचेच. त्यात क्षुल्लक चूकही माफ नाही, ही भावना ठेवून काम करावे लागते. निकोप लोकशाहीचे प्रतीक असलेली निवडणूक साधा आरोप न होता पार पाडणे, हे आमचे कर्तव्यच, असे रासपायले म्हणतात. जिल्हाधिकारी रात्री या सर्वांसोबत जेवले, तोच काय तो विरंगुळा. मतदान तसेच यंत्र सोपविण्याचा सोपस्कार पूर्ण करीत ९० टक्के निवडणूक अधिकारी व कर्मचारी निवांत झाले. पण या चाळीस व्यक्तींना विश्रांती नाहीच. थोडीही चूक आणि सेवेतून गच्छंती, असे भय संपता संपत नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha district collector office 40 officers and employees continuosly working on election duty without a break pmd 64 css