महिला कर्मचाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत बोलणे, कनिष्ठ सहकाऱ्यांना धमकावणे, सतत दहशतीचे वातावरण निर्माण करणे एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला चांगलेच भोवले. वरिष्ठांनी त्याला वाचवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, बेताल वागणुकीचा कहर झाल्याने शनिवारी त्याला निलंबित करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- चंद्रपूर: ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वि. स. जोग यांची निवड

वरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एम.पीम्. राठोड यांच्या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून कनिष्ठ सहकाऱ्यांच्या तक्रारी होत्या. सातत्याने अपमान करणे, महिला सहकाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत बोलणे अशा अनेक तक्रारींचा पाढा वरिष्ठांसमोर मांडण्यात आला. तरीही त्याला वाचवण्याचे काम त्यांनी केले. मात्र, याचा कामकाजावर विपरित परिणाम होत असल्याने कर्मचारी संघटनेने अखेर कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे शनिवारी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्र.ज. लोणकर यांनी राठोड यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warora forest range officer suspended after persistent complaints from junior colleagues nagpur dpj
First published on: 03-12-2022 at 17:42 IST