लोकसत्ता टीम

नागपूर : समृद्धी महामार्गावरील महिलेच्या हत्त्येचे गुढ कायम आहे. महिलेवर बलात्कार करून खून केल्याची शक्यता असल्यामुळे महिलेची ओळख पटविण्यास पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. महिलेचे छायाचित्र प्रसारित करून ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

आणखी वाचा-सना खान हत्याकांड प्रकरणात आरोपपत्र दाखल, पोलिसांचे काय आहेत दावे?

नागपूर – मुंबई समृधी महामार्गा लगत एका शेतात नुकताच एका महिलेचा मृतदेह आढळला होता. तिची हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता आहे. महिला मध्यप्रदेश किंवा छत्तीसगडमधील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलेचे छायाचित्र पोलिसांनी समाजमाध्यम आणि पोलिसांच्या संकेतस्थळावरून प्रसारित केले आहे.