बुलढाणा : विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करीत असताना उच्च दाबाचा विद्युत धक्का लागून युवकाचा मृत्यू झाला. यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संग्रामपूर तालुक्यातील कोद्री शिवारात ही दुर्देवी घटना घडली. योगेश महादेवन खोंड ( वय ३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दांदडे यांच्या शेतातील विद्युत खांबावर चढून दुरुस्तीचे काम करीत असताना विद्युत धक्का लागून योगेश खाली फेकल्या गेला. यावेळी तिथे धाव घेणाऱ्या ग्रामस्थांनी त्याला वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी योगेशला मृत घोषित केले.

हेही वाचा – गडचिरोली : केडमारा चकमकीविरोधात नक्षल्यांची पत्रकबाजी; बंद यशस्वी करण्याचे आवाहन

जेमतेम तिशीत दगावलेल्या योगेशच्या पश्चात आई वडील, पत्नी असा परिवार आहे. तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नंदकिशोर तिवारी तपास करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth died due to high pressure electric shock while working on a pole scm 61 ssb