नाशिक – पाटबंधारे विभागाच्या शाखा अधिकाऱ्यास १५ हजार रुपयांची लाच घेण्याच्या प्रकरणात मालेगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच वर्षाची सक्तमजुरी, १० लाख रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. लाचखोलीच्या प्रकरणात दोष सिध्द होण्याचे प्रमाण अत्यल्प असतांना या अधिकाऱ्यास झालेल्या शिक्षेमुळे लाचखोरीला कुठेतरी लगाम बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सटाणा येथील लघु पाटबंधारे शाखा अधिकारी राजु रामोळे याने २०१९ मध्ये तक्रारदाराकडे जाखोडा धरणातून गाळ काढण्याच्या मोबदल्यात तसेच गाळ काढणे काम सुरू ठेवण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेतली होती. रामोळेविरोधात सटाणा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखला झाला होता. या खटल्याचे कामकाज मालेगावच्या अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर चालले. पोलिसांनी केलेला तपास आणि साक्षीदार यांनी दिलेल्या जबाबामुळे गुन्हा सिध्द न्यायालयाने रामोळे यास शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक मृदूला नाईक, साधना इंगळे यांनी केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forced labor in the case of bribery to the branch officer of the irrigation department amy