नाशिक : अमली पदार्थ माफिया ललित पाटीलशी २०१६ नंतर आपला कोणताही संपर्क झालेला नाही. या संदर्भातील पोलीस चौकशीला आपले सहकार्य असेल, असे आश्वासन ठाकरे गटाचे नेते तथा माजी महापौर विनायक पांडे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले. ललित पाटील प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना माजी महापौर पांडे यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पांडे यांच्या माध्यमातूनच ललितचा शिवसेनेत प्रवेश झाल्याचा आरोप होत असल्याने पांडे यांचीही पोलिसांकडून चौकशी होईल, अशी चर्चा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमिवर पांडे यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. रिपब्लिकन युवा आघाडीचा माजी युवा जिल्हाध्यक्ष असलेल्या ललितच्या पत्नीला उपनगरातून निवडणूक लढवायची असल्याने एकाच्या माध्यमातून तो आपल्या संपर्कात आला होता. त्यावेळी तत्कालीन महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि संपर्क मंत्री यांच्या माध्यमातून त्याचा शिवसेनेत प्रवेश सोहळा झाला. दादा भुसे त्यावेळी राज्यमंत्री होते. पक्ष प्रवेश सोहळ्यास तेही उपस्थित होते, असे पांडे यांनी सांगितले.

हेही वाचा : धुळे जिल्ह्यात बिबट्याचा पुन्हा बालकावर हल्ला; पाच दिवसांतील तिसरी घटना

ललितशी त्यानंतर संपर्क आला नाही. २०१८ मध्ये त्याने माझ्या नातेवाईकांचा विदेशात बकऱ्या पाठविण्याचा व्यवसाय बळकावला. त्यामुळे आम्हा दोघांमध्ये वाद झाले. त्यावेळी त्याला फोन केला होता. त्यानंतर त्याच्याशी बोलणे झालेले नाही. ललितची गाडी चालवणारा चालक माझ्याकडे कामाला होता. दीड वर्षापूर्वीच त्याला कामावरून काढून टाकले. याबाबत पोलिसांनी चौकशी केल्यास आपण सहकार्य करू, असे पांडे यांनी सांगितले.

हेही वाचा : नाशिक लोकसभेसाठी भाजपची मोर्चेबांधणी; कार्यपुस्तकाद्वारे मतदार संघात प्रचार

सराफीस अटक

ललित पाटील प्रकरणात नाशिकमधील एका सराफ व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे. बेकायदेशीररित्या सोने उपलब्ध करुन दिल्याच्या संशयावरुन सराफ बाजारातील एका व्यावसायिकाला ताब्यात घेण्यात आले. यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik shivsena thackeray faction leader and former mayor vinayak pande says will cooperate with the investigation in lalit patil drugs case css