नाशिक : सिडकोतील नागरिकांना मिळणाऱ्या दुषित पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी भाजप दिव्यांग विकास आघाडी आणि सिडको मंडळ यांच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांना निवेदन देण्यात आले.सिडकोतील अनेक प्रभागांमध्ये काही महिन्यांपासून दूषित आणि गंधयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.

अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासनाने ठोस पावले उचलली नसल्याने आंदोलन करावे लागले असल्याचे दिव्यांग आघाडीचे बाळासाहेब घुगे यांनी सांगितले. नागरिकांनी दुषित पाणी घेऊन सिडको विभागीय कार्यालय गाठले. विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांना निवेदन देण्यात आले. आठ दिवसांच्या आत समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुदतीत समस्या दूर न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा घुगे यांनी दिला.या आंदोलनात प्रदीप केकाणे, आरती खैरनार यांच्यासह राहुल गणोरे, दिलीप देवांग, राजेंद्र जडे, सागर कडभाने, न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई घुगे आदी उपस्थित होते.