नाशिक : इ चावडी प्रणालीतील पहिल्या भागात तलाठी दप्तरांच्या आकारणीविषयक अद्ययावतीकरण करून प्रत्येक गावातील महसूल मागणी निश्चिती व त्यानुसार महसुलाची वसुली या प्रकिया ऑनलाईन करण्याची कार्यवाही तालुक्यातील सर्व गावांमध्ये सुरू आहे. केवळ नाशिक शहरातील एक ते पाच क्रमांकाच्या तलाठी कार्यालयास महसूल कृषिक व अकृषिक वसुली तांत्रिक कारणाने करता येत नाही. परिणामी दोन महिन्यांपासून कोट्यवधींची वसुली थांबली असल्याची बाब जिल्हा प्रशासनासमोर मांडण्यात आली आहे. इ चावडी प्रकल्पात महसुली वसूली, मागणी निश्चिती व आकारणी दुरुस्ती करताना येणाऱ्या अडचणींकडे या पाच कार्यालयातील तलाठ्यांनी लक्ष वेधले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इ चावडी प्रणालीतील सुधारणांबाबत वारंवार पुण्याच्या एनआयसी संस्थेला कळवूनही परिस्थितीत बदल झाले नाहीत. २०२३-२४ या वर्षात वसुलीचे कामकाज न झाल्यास त्यास आम्हाला जबाबदार धरू नये, असेही नाशिक शहर तलाठी कार्यालयाने नाशिक तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नाशिक शहरातील एक ते पाच तलाठी कार्यालयात कृषिक व अकृषिक वसुली करून खातेदारांना इ चावडीद्वारे तयार होणाऱ्या पावत्या देण्याची तयारी करण्यात आली होती. परंतु, लॉगिनमधून मागणी निश्चितीचे काम पूर्ण झाले नसल्याने आणि शहरातील सर्व सात बारा उतारावरील आकारणी दर वेगवेगळा आहे. यात आकारणी दुरुस्ती होणे आवश्यक आहे. या कामास लागणारा वेळ लक्षात घेता ही सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून वसुली रक्कम घेऊन पावती देणे योग्य होणार नाही. त्यामुळे एक ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या दोन महिन्यात वसुलीचे कामकाज होऊ शकले नाही, असे तलाठी कार्यालयाने नमूद केले आहे.

हेही वाचा : कांदाप्रश्नी केंद्रीय राज्यमंत्री मूग गिळून, भाजपला माजी खासदाराकडून घरचा अहेर

नाशिक शहरातील एक ते पाच तलाठी कार्यालयातील सर्व सात बारा उतारे हे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. महसुली वसुली मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी दोन महिन्यांपासून वसुली ठप्प आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर वसुलीशी संबंधित कामकाज करता येईल. त्यामुळे भविष्यात इ चावडीबाबत वसुलीचे काम न झाल्यास आम्हाला जबाबदार धरू नये, असे साकडे त्यांनी घातले आहे. जिल्हा प्रशासनाने या अडचणी एनआयसी संस्थेच्या निर्दशनास आणून द्याव्यात. आम्ही वेळोवेळी लेखी स्वरुपात पाठपुरावा केल्याचे शहर तलाठी कार्यालयाचे म्हणणे आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik talathi office revenue stopped due to technical problems in echawadi system css