पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेसंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत सध्या बांधकाम सुरु असणारं राम मंदिर पाडून पुन्हा त्या ठिकाणी बाबरी मशिद बांधण्याचा पीएफआयचा कट होता. यासंदर्भात इतर मुस्लिमबहुल देशांमधील सदस्यांसोबत या संस्थेचे कार्यकर्ते संपर्कात होते असा दावा सरकारी वकिलांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयासमोर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अयोध्येतील राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशिद उभारण्याचा कट रचला होता अशी माहिती नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी ही माहिती दिली आहे. संपूर्ण भारत देश मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी बाबरी मशिद पुन्हा उभारण्याचा डाव असल्याचं एनआयच्या तपासातून समोर आलं आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभरातील अनेक ठिकाणी केलेल्या छापेमारीत शेकडो पीएफआयच्या कार्यकर्त्यांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी पाच प्रमुख संक्षयित आरोपींच्या तपासामध्ये ही माहिती समोर आल्याचं न्यायालयात सांगण्यात आलं आहे.

सप्टेंबरमध्ये झालेल्या छापेमारीत औरंगाबाद, नाशिकपासून अनेक शहरांमधून पीएफआयच्या सक्रीय सभासदांना अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या तपासात अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत ज्यामधून देश विघातक कृत्यांमध्ये ही संस्था सहभागी असल्याचं स्पष्ट झालं आहे. २०४७ पर्यंत संपूर्ण देशाला मुस्लिम राष्ट्र करण्याचं मॉड्यूल या संघटनेनं बनवलं होतं यासंदर्भातील पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. या तपासामध्ये बरीच माहिती समोर आली असून आरोपींचा ताबा मिळवण्यासंदर्भातील न्यायालयातील युक्तीवादामध्ये सरकारी पक्षाने यासंदर्भातील माहिती दिली.

राम मंदिराचं बांधकाम सुरु आहे ते पाडून पुन्हा एकदा बाबरी मशिद उभारावी अशापद्धतीचं एक मॉड्यूल आणि अजेंडा या संस्थेचा होता. पीएफआयचे पाच संक्षयित आरोपी एटीएसच्या ताब्यात आहेत. हे पाचही आरोपी परदेशात देखील जाऊन आले आहेत. त्यांच्या खात्यावर परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसे देखील जमा झालेले आहेत. या सगळ्या सभासदांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपचा अॅडमीन पाकिस्तानमधील असल्याची माहिती तपासात समोर आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये बाकी मुस्लिम राष्ट्र आणि भारतातील हे मुस्लिम सदस्य असा यांचा एकत्रित पद्धतीचा कट होता.

महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, गुजरात, आसाम आणि मध्य प्रदेश या राज्यांत दिवसभर छापे घातले. राष्ट्रीय तपास संस्थेसह (एनआयए) पोलिसांनी पुणे, नांदेड, औरंगाबाद, नगर, संगमनेर, मिरज, ठाण्यात छापे टाकून ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. यानंतर पाच वर्षांसाठी पीएफआयवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular front of india pfi plan to demolish ram mandir in ayodhya and reclaim the babri masjid says government lawyer in nashik court scsg