चित्रपटांमध्ये जसं अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असं कोरलं होतं, तसंच शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ असं कोरलं आहे, याचा त्रास त्यांना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत होईल, असे म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना लक्ष्य केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे ‘****’ संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको. राहिला प्रश्न आम्ही लढायचं की पडायचं, तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. शिवसेना-भाजपा म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठीक आहे, पण महाराष्ट्रात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुमच्या किती जागा निवडून येतात ते आपण बघू…”, असं गायकवाड म्हणाले होते.

हेही वाचा : “मोदींचा अपमान हा गुजरातचा अपमान, पण छत्रपतींचा…”, शिवसेनेचे भाजपावर टीकेचे आसूड, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावरूनही घेतला समाचार

यावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत आव्हान दिलं आहे. “मला कोणी ‘गद्दार’ म्हटल्यावर शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो. कारण ते ‘गद्दार’ आहेत. त्यांना उत्तम शिव्या देता येत असतील, तर सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपाचे राज्यपाल, प्रवक्ते मंत्री यांना द्यावात. आम्ही त्या शिव्या देणाऱ्यांवरती फुले उधळू. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्या, महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल,” असे आव्हान संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना दिलं आहे. संजय राऊत नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut challenge shinde group mla on chhatrapati shivaji maharaj governor koshyari ssa
First published on: 03-12-2022 at 10:45 IST