Premium

नाशिक: पंचवटीत अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिसांवर दगडफेक

पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

stone pelting police encroachment clearance team panchavati nashik
पंचवटीत अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिसांवर दगडफेक (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: महानगरपालिकेच्यावतीने पंचवटी विभागात मंगळवारी सकाळी अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई सुरू असताना जमावाने मनपा पथकासह पोलिसांवर दगडफेक केल्याने एकच गोंधळ उडाला. यात काही जण जखमी झाले असून जेसीबीचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

पंधरवड्यापासून शहरात अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू आहे. त्या अंतर्गत रस्त्यावरील लहान-मोठ्या टपरीधारकांपासून ते अनधिकृत दुकाने, बंगले वा तत्सम बांधकामे हटविली जात आहेत. मंगळवारी सकाळी १० वाजता मनपाचे पथक मखमलाबाद-पेठ रस्त्याला जोडणाऱ्या कॅनॉल रस्त्यावर पोहोचले. या ठिकाणी कालव्याच्या आसपास अनधिकृतपणे २० ते २२ झोपड्या उभारल्या गेल्या आहेत.

हेही वाचा… जळगाव: ऑनलाइन व्यापाराच्या नावाखाली फसविणार्‍यास भावनगरातून अटक; पाच लाखांची रोकड हस्तगत

पोलीस बंदोबस्तात पथकाने त्या हटविण्याची कारवाई सुरू केली. काही वेळात मोठा जमाव जमा झाला. कारवाईला विरोध करीत त्यांच्याकडून जेसीबीवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करताच त्यांच्यावरही दगड भिरकावले गेले. यात काही कर्मचारी किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच जादा बंदोबस्त मागविण्यात आला. दगडफेक करणाऱ्यांची धरपकड करण्यात आली. त्यांच्याविरुध्द दगडफेक व शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stone pelting on police with encroachment clearance team in panchavati dvr

First published on: 30-05-2023 at 12:46 IST
Next Story
नाग्या-साक्या पुलावरून कार कोसळली; बालिकेसह तीघांचा मृत्यू ; सात जण गंभीर