जळगाव – शहरातील औद्योगिक वसाहतीतील व्ही सेक्टरमधील  फातिमानगर भागात जुन्या वादातून एकाने हवेत दोन गोळ्या झाडल्या. गुरुवारी हा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी धाव घेत संशयित स्वप्नील ऊर्फ सोपान परदेशी (२५, रा. कुसुंबा, ता. जळगाव) याला ताब्यात घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नाशिक – पुणे मार्गावर लवकरच इ – शिवाई बससेवा; विभागात दोन बस दाखल

घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी केली जात आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात शहरातील शिवाजीनगर-हुडको भागात लहान मुलांच्या भांडणावरून, तसेच वाळूमाफियांकडून खंडणीवरून अशा गोळीबाराच्या दोन घटना घडल्या होत्या. या घटना ताज्या असतानाच  औद्योगिक वसाहतीतील फातिमानगर भागात पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने पोलिसांचा धाक संपला की काय, असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात असून, घटनेने जळगाव शहर पुन्हा हादरले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspect arrested for firing in fatima nagar in jalgaon zws