बंदुकीचा धाक दाखवित व्यावसायिकास लुटणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकच्या वतीने ताब्यात घेण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या महात्मा गांधी रस्त्यावर राहणाऱ्या एका व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवित त्यांच्याकडील ९७ हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावली. रोख रकमेसह गळ्यातील सोनसाखळी, भ्रमणध्वनी आणि एटीएम कार्डही हिसकाविले. एटीएम कार्डचा वापर करीत त्याव्दारे पैसे काढले होते. त्यावरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> तुकाराम मुंढे यांना जळगावचे आयुक्त करा : प्रहार जनशक्तीची स्वाक्षरी मोहीम

गुन्हे शाखा विभाग एकचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे अधिकारी आणि अंमलदार हे समांतर तपास करीत असतांना सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित हा शहापूर तालुक्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरीष्ठ निरीक्षक ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली रवाना झालेल्या पथकाने शहापूर तालुक्यातील खरीवली, निमणपाडा येथे जावून किरण गोरे (२४, रा. बामणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बंदूक, एसबीआय आणि ॲक्सिस बँकेचे डेबीट कार्ड, जबरीने चोरलेला माल तसेच इतर दोन भ्रमणध्वनी हस्तगत करून संशयिताला नाशिकरोड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspect who robbed a businessman at gunpoint arrested by crime branch zws