सिन्नर तालुक्यात विहिरीत तीन शाळकरी विद्यार्थ्यांना फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातील एकाने हुशारीने विहिरीत लटकलेला दोर पकडून आपल्यासह अन्य दोन साथीदारांनाही सुखरूप बाहेर काढले. सिन्नर पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस

सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे बुधवारी सायंकाळी अथर्व घुगे, वरद घुगे आणि आदित्य सानप ही १० ते १२ वयोगटातील मुले खेळत होती. यावेळी त्यांच्या ओळखीच्या अमोल लांडगे याने तिघांना जवळच असलेल्या विहिरीजवळ जा आणि तेथे असणाऱ्या दोघांकडून कासव घेऊन या, असे सांगितले. कासव आणण्यासाठी तिघेही विहिरीजवळ पोहचले. विहिरीजवळ असलेल्या संशयित विक्रम माळी, साईनाथ ठमके (रा. वडगाव पिंगळा) आणि अमोल यांनी एकत्र येत तिघा मुलांना तुडूंब भरलेल्या विहिरीत फेकून पळ काढला.

हेही वाचा >>> नाशिक : मुकेश शहाणे धमकी प्रकरणी गुन्हा दाखल  

यावेळी एकाने प्रसंगावधान राखत विहिरीत असलेल्या मोटारीचा दोरखंड पकडून ठेवला. सर्वप्रथम दोराच्या मदतीने बाहेर येत नंतर दोराच्या मदतीने विहिरीतील दोघांनाही बाहेर काढले. तीनही मुले या प्रकारामुळे घाबरल्याने त्यांनी घरी कोणालाच हा प्रकार सांगितला नाही. परंतु, मुलांच्या ओल्या कपड्यांमुळे पालकांना संशय आला. त्यांनी विचारल्यावर मुलांनी सर्व प्रकार सांगितला. पालकांनी सिन्नर पोलीस ठाणे गाठत संशयितांविरुध्द तक्रार दिली. पोलिसांनी अमोल लांडगे याला ताब्यात घेतले आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस अन्य संशयितांचा शोध घेत आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three suspects in police custody for attempt to killing three students by throwing them in a well zws