जळगाव – हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने तापी, पूर्णा या नद्यांना पूर आला असून, धरणाच्या जलपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी नऊला धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून, तापी नदीपात्रात सद्यःस्थितीत ४,२३,३९४ क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पूर्णा व तापी नदीक्षेत्रात सातत्याने चांगला पाऊस होत आहे. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसामुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हतनूर धरणात पाण्याची मोठी आवक वाढली आहे. सद्यःस्थितीत धरणाची जलपातळी २१२.६१० मीटर असून, धरणात एकूण ३०९.४० दशलक्ष घनमीटर अर्थात ७९.७४ टक्के जलसाठा आहे. थेट संचयन १७६.४० दशलक्ष घनमीटर अर्थात ६९.९२ टक्के आहे.

हेही वाचा – पिंपळगाव, सिन्नरमध्ये एटीएम फोडणारा ताब्यात, इतर जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातही गुन्हे

हेही वाचा – खैराची तस्करी करणारे दोन जण ताब्यात; बाऱ्हे वनपरिक्षेत्रात लाकूड चोरी रोखण्यात यश

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने तापी, पूर्णा या नद्यांना पूर आला असून, धरणाच्या जलपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी नऊला धरणाचे ४१ पैकी चार दरवाजे पूर्ण, तर ३२ दरवाजे दीड मीटरने उघडून तापी नदीपात्रात १,७९,८९५ क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला होता. पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रालगत जाऊ नये, गुराढोरांनाही त्यापासून दूर ठेवावे, असे आवाहन शाखा अभियंत्यांसह जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.