scorecardresearch

Premium

पिंपळगाव, सिन्नरमध्ये एटीएम फोडणारा ताब्यात, इतर जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातही गुन्हे

पिंपळगाव बसवंत येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडणारा आंतरराज्य सराईत गुन्हेगार ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकला

ATM-breaker-arrested
पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत ऑगस्टमध्ये चिंचखेड चौफुली परिसरातील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्यात आले होते.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: पिंपळगाव बसवंत येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडणारा आंतरराज्य सराईत गुन्हेगार ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून सिन्नर परिसरात एटीएम फोडल्याची कबुलीही त्याने दिली.

aromatic betel nuts Yavatmal
यवतमाळ : सुगंधित सुपारीच्या तस्करीसाठी ‘अंडे का फंडा’!
seeds worth 9 lakhs seized from farmers in Andhra Pradesh
आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांकडून ९ लाखांचे चोरबिटी बियाणे जप्त
maharashtra weather update in marathi, maharashtra rain marathi news, chances of rain in maharashtra marathi news
राज्याच्या ‘या’ भागांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’
traffic
शहरबात: दापचरी सीमा तपासणी नाक्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण

पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत ऑगस्टमध्ये चिंचखेड चौफुली परिसरातील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्यात आले होते. एटीएमचे शटर अर्धवट उघडून यंत्र गॅस कटरच्या मदतीने कापत २८ लाख ३५ हजार ४०० रुपये लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी घटनास्थळी भेट देत तपासाविषयी सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील, निरीक्षक सुनील पाटील यांनी एटीएम चोरीत गुन्हा करण्याची पध्दत, गुन्हा करतांना वापरण्यात आलेल्या वाहनांचा तपास करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात तपास पथके रवाना केली होती. राज्यातील विविध शहरात एटीएम चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती संकलित केली.

आणखी वाचा-जळगावात डेंग्यूने तरुणाचा मृत्यू; तीन मुले बाधित

हरियाणा राज्यातील काही गुन्हेगार हे राज्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने नाशिक आणि अहमदनगर येथील सीमावर्ती भागात सापळा रचत एटीएम चोरीतील सराईत गुन्हेगार इरशाद खान (३८, रा. हरियाणा) याला ताब्यात घेतले. त्याने पिंपळगाव येथे साथीदारांसह एटीएम फोडल्याची कबुली दिली.

इरशादने गुन्ह्यात एक सफेद रंगाची कार आणि एक मालवाहतूक वाहनाचा वापर केला होता. हरियाणातून वाहने भाड्याने ठरवित विविध राज्यातील बनावट नंबरपट्टी वाहनांवर लावून त्यातून एटीएम फोडण्यासाठी गॅस कटर, सिलिंडर सोबत घेऊन जात असे. महामार्गाजवळील एटीएम केंद्रांची गुगल नकाशाद्वारे अगोदर माहिती काढून, नंतर पाहणी करुन ते केंद्र फोडत असल्याची माहिती इरशादने दिली. इरशादने यापूर्वी अहमदनगर, लातूर, हिंगोली, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये तसेच मध्यप्रदेशातही एटीएम चोरी आणि जनावर चोरी केली आहे. सिन्नर शहरात ॲक्सिस बँकेचे एटीएम चोरल्याची कबुलीही त्याने दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस पथकाने केलेल्या तपासाबद्दल अधीक्षक उमाप यांनी १० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Atm breaker in pimpalgaon and sinnar is arrested crime in madhya pradesh along with other districts mrj

First published on: 15-09-2023 at 14:29 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×