नवी मुंबई : अटल सागरी सेतूचे उदघाटन आणि त्या नंतर होणाऱ्या सभेसाठी नवी मुंबई महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमातील १०० बस सुविधा देण्यात आली आहे. शहरातील ठिकठिकाणाहून या बस निघणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा-पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे कधी नव्हे ते शक्य झालं…नवी मुंबई शहर आणि परिसरात वाहतूक कोंडी मुक्त प्रवासाचा आनंद

न्हावा शेवा ते शिवडी या सागरी सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केले जाणार आहे. त्या नंतर मोदी यांची सभा असून या सभेला जाण्यासाठी नवी मुंबईतून लोकांना जाण्यासाठी एन एम एम टी ने १०० गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यात इलेक्ट्रॉनिक आणि डिझेल गाड्यांचा समावेश असणार आहे. सदर गाड्या नवी मुंबईतील दिघा ऐरोली ते सीबीडी मधून ठिकठिकाणाहून निघणार आहे. यासाठी भाजप नेत्यांशी समन्वय ही साधण्यात आलेला आहे. अशी माहिती एनएमएमटीने दिली आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 nmmt bus to go and come from narendra modis meeting mrj