हार्बर मार्गावरील मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या शेजारी पार्कींग करण्यात आलेल्या ४२ हून अधिक दुचाकींना आग लागल्याची घटना घडली आहे आगीचे प्रमाण एवढे भीषण होते की पार्कींगमधील ४२ दुचाकींनी एकामागे एक पेट घेतला. यामध्ये काही दुचाकी अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्या.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा- खारघर वसाहतीच्या चतु:सीमेपर्यंत दारुबंदीचा निर्णय; पनवेल पालिका आयुक्तांचा मोठा निर्णय
या आगेची माहिती मिळाल्यानंतर सिडको महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून आग विजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे लोट झपाट्याने पसरत होते. तरीही अग्निशमन दलाच्या जवानांमुळे सुमारे १० वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचली. नेमकी ही आग कोणी लावली की लागली याबाबत पोलीस व अग्नीशमन यंत्रणेचे अधिकारी तपास करीत आहेत.
First published on: 28-11-2022 at 20:39 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 42 two wheelers outside mansarovar railway station in navi mumbai burnt down dpj