आज सव्वापाचच्या सुमारास नेरूळ  येथे कारने जात असताना बांधकाम व्यावसायिकांवर गोळ्या झाडण्यात आल्या.गोळ्या झाडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सावजी पटेल असे असून ते बांधकाम व्यावसायिक होते . नवी मुंबई पोलीस अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. नेरूळ येथे सावजी पटेल हे आपल्या वाहतानातून जात असताना एका दुचाकीवर आलेल्या दोघा मारेकऱ्यांनी त्यांच्या छातीत आणि पोटात अशा तीन गोळ्या झाडल्या पटेल यांचा गाडीतच मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नवी मुंबई : व्यवसायिक वाहनांना वेग नियंत्रक बंधनकारक; वेग नियंत्रकाविना वाहन पासिंग नाही

घटना स्थळी गोळ्यांच्या तीन नळ्या मिळून आल्या आहेत. व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.मात्र हत्येचे नेमके कारण अद्यापी समोर आले नसल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली.सावजी पटेल हे आपल्या कारने नेरूळ येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखून या गोळ्या झाडल्या.गोळीबाराचा आवाज झाल्याने स्थानिक भयभीत नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षात याबाबत माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर सावजी पटेल यांचा मृतदेह गाडीत आढळून आला.पोलिसांना घटनास्थळी तीन रिकामी काडतूस सापडले असून पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.या हत्येच्या निमित्ताने अनेक वर्षानंतर नवी मुंबई पुन्हा या हत्येने हादरली आहे.बांधकाम व्यावसायिकाची हत्या झाल्याने पोलीस देखील सतर्क झाले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Builder sauji patel shot dead in nerul zws