पनवेल – रुग्णालयातील डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे बिहार येथील मुलीवरील अत्याचाराला नवी मुंबईत वाचा फुटली. ही घटना बिहार राज्यात घडली असली तरी संबंधित पिडीता तीच्या मावशीसोबत नवी मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात गर्भपिशवीच्या शस्त्रक्रीयेसाठी गेली होत. मात्र स्वताच्या पोटदुखीची सुद्धा तपासणी करून घेण्यासाठी पिडीता डॉक्टरांसमोर गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

पिडीता ही मावशीसोबत खांदेश्वर येथे गेल्या पंधरादिवसांपूर्वी राहयला आली होती. पिडीतेच्या मावशीचे गर्भपिशवीची शस्त्रक्रीया असल्याने पिडीता रुग्णालयात मावशीसोबत गेली होती. पिडीतेची पोटदुखीची तक्रार असल्याने तीला रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासल्यानंतर ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत समजले. अखेर या घटनेची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याला कळविल्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कायद्याप्रमाणे दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. 

पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरील माहितीनूसार पिडीता व तीची आईसोबत बिहार येथील बौद्धगया येथे राहतात. मार्च महिन्यात पिडीतेला शेजारच्यांकडे सोडून तीची आई मूळ गावी गेली होती. या दरम्यान या पिडीतेला जेवणात गुंगीकारक पदार्थ शेजारच्या व्यक्तीने देऊन तीच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी या प्रकरणी दोन व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी हा गुन्हा बिहार राज्यातील बौध्दगया पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.