नवी मुंबई : नेरुळ एनआरआय कॉम्प्लेक्सच्या  पाठीमागील  बाजूस  नेरुळ सेक्टर ६० येथील डी व ई येथे मे. मिस्त्री कन्स्ट्रक्शन यांना पालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी देण्यात आली नाही त्यामुळे विनापरवाना सुरु असलेल्या कामाबाबत खुलासा सादर करावा अन्यथा  महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना  अधिनियम १९६६ चे प्रकरण ५२ व ५३ अन्वये कारवाई करण्याचा इशारा लेखी पत्राद्वारे दिलेला असून या ठिकाणी पालिकेच्या बांधकाम परवानगीविना सुरु असलेले काम तात्काळ थांबवण्याची मागणी पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरीकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीवूड्स एनआरआय कॉम्प्लेक्स येथील कामावरुन पर्यावरणप्रेमींनी वारंवार पालिका,सिडको, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत .एनआरआय कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूस पाणथळ जमिनीवर बहुमजली ९ निवासी संकुले व गोल्फ मैदान बनविण्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दुसरीकडे न्यायालयाच्या सूचनांना  व पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत या ठिकाणी बेकायदा बांधकाम सुरु आहे.

हेही वाचा >>> पनवेल : पाण्यासाठी कामोठेवासियांचा सिडको कार्यालयात ठिय्या

सीवूड्स एनआरआय परिसरात सिडकोच्या परवानगीने मिस्त्री कंन्सट्रक्शन यांनी ७२४ झाडे तोडल्याप्रकरणी तसेच येथील गोल्फ कोर्स व गृहसंकुल निर्मिती प्रकरणाबाबत सुरवातीपासूनच पाठपुरावा करणारे या विभागातील पर्यावरणप्रेमी व नागरीक यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. सीवूडस सेक्टर ६० एनआरआय़ कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजुस असलेल्या ऐ,बी,सी डी व ई ब्लॉकमधील ३३.५५ हेक्टर जागेवर गोल्फ कोर्स व बहुमजली निवासी उभारण्याची परवानगी सिडकोने दिली आहे.परंतू सर्वोच्च न्यायालयानेही ऑक्टोबर २०१७मध्ये ही जागा पाणथळ यादीत असल्याने येथील काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते.नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील या जागेवर बांधकाम परवानगी सिडकोने दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून पालिकेच्या अधिकारावर हा गदा आणण्याचा प्रकार असून पालिकेनेही याबाबत संबंधित मे. मिस्त्री कन्स्ट्रक्शनला खुलासा करण्याचे पत्र दिले आहे.त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री यांनी तातकाळ लक्ष घालून नेरुळ एनआरआय जवळील बेकायदा काम तात्काळ थांबवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागानेही संबंधित कंपनीला तात्काळ खुलासा करण्याचे पत्र दिले आहे.परंतू अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याबद्दल स्थानिक नागरीकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आता याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एनआरआय कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूस असलेल्या डी व ई पॉकेटमध्येपालिकेची कोणतीही परवानगी न घेता काम सुरु आहे.याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पर्यावरण विभाग, मुख्य सचिव यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून त्यांनी तात्काळ येथील बेकायदा काम थांबवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

सुनील अग्रवाल ,पर्यावरणप्रेमी

एकीकडे पर्यावरण वाचवा असे उपक्रम राज्यस्तरावर राबवायचे व याच सरकारी आस्थापना पर्यावरणाता ऱ्हास होणाऱ्या बेकायदा प्रकल्पांच्या कामाकडे दुर्लक्ष करते हे खेदजनक असून मिस्त्री कन्स्ट्रक्शनचे बेकायदा काम तात्काळ थांबवायला पाहीजे.

अमिताभ सिंग,स्थानिक रहिवाशी

नेरुळ एनआरआय जवळील जागा पाणथळ म्हणून असताना दुसरीकडे बेकायदा काम सुरु असून सिडकोला अधिकार नसताना पालिकेच्या जागेतील जागेवर बांधकाम परवानगी दिली. पालिकेनेही फक्त खुलासा पत्र नाही तर तेथील कामावर तात्काळ स्टे आणून बेकायदा कामावर कारवाई केली पाहीजे.या ठिकाणचे बांधकामाचे पाणी मागील बाजूला असलेल्या तलावात सोडले जात आहे.एस. के.मिश्रा,स्थानिक रहिवाशी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environmentalist and local appeal cm to stop illegal work of mistry construction in nerul zws
First published on: 06-10-2022 at 19:13 IST