नवी मुंबई पोलीसांनी दोन वेगवेगळ्या धाडसत्रामध्ये १८ लाख ९९ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह गुटख्याची पाकीटे जप्त केली आहेत. अन्न सूरक्षा आणि मानके अधिनियमाअंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. या दोनही गुटख्यांच्या कारवाईमुळे पनवेलमध्ये गुटख्याची विक्री करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा- राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काळी विमान उडवत गाजर दाखवत निषेध आंदोलन
यातील पहिली धाड शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता मुंब्रा पनवेल महामार्गावर धानसर टोलनाक्यावर भाजीपाल्याची वाहतूक करणा-या टेम्पोवर टाकण्यात आली. यामध्ये १७ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल व गुटखा सापडला. तर दूस-या धाडसत्रात कळंबोली येथील रोडपाली गावाजवळील काळूबाळू नगरामध्ये राहणा-या पानटपरी चालविणा-या व्यक्तीने गोदामात १ लाख ७१ हजाार रुपयांचा गुटख्याची साठवणूक केली होती. विशेष म्हणजे अजूनही पनवेल व परिसरात राजरोसपणे टप-यांवर गुटख्यांची पाकीटांची विक्री काळ्याबाजारात सूरु आहे.
हेही वाचा- महिन्याभरात कांदा गगनाला भिडणार! सोमवारी एपीएमसीत प्रतिकिलो कांदा ३५ रुपयांवर
परराज्यातून गुटख्याची वाहतूक रायगड व नवी मुंबईत केली जात असल्याची बातमी नवी मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. एस. सय्यद यांनी त्यांच्या पथकासह गेल्या आठवड्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून ते शुक्रवारी पहाटेपर्यंत मुंब्रा पनवेल महामार्गावरील धानसर टोलनाक्यावर सापळा रचला. पहाटे साडेपाच वाजता एका टेम्पोची झडती घेतल्यावर पोलीसांना भाजीपाल्याच्या रिकामी कॅरेटच्या खाली बेकायदा गुटख्याची पाकीटे लपविली दिसली. यावेळी पोलिसांनी तब्बल १० लाख रुपये किमतीच्या गुटख्याची पाकीटे जप्त केली आहेत.
हेही वाचा- वाहनाच्या धडकेत कोल्हा जखमी; वाढत्या नागरीकरणामुळे उरणमधील वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात
गुटख्याच्या वाहतूकीसाठी वापलेला महिंद्रा बोलेरो टेम्पो जप्त केला. त्याची किमत ७ लाख रुपये आहे. दूस-या कारवाईत कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पाटील यांना गोपनिय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रोडपाली परिसरातील काळूबाळू नगरमधील खोली नंबर १५ येथील झडती घेतल्यानंतर २४ वर्षीय चित्तरंजन बारीक या मुलाने पावणे दोन लाख रुपये किमतीच्या गुटख्याची साठवणूक केल्याचे पोलीस पथकाला दिसले. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दिनेश पाटील यांनी तातडीने हा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.