नवी मुंबई : नवी मुंबईत दिवसेंदिवस निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार मनसेकडून उघडकीस आणला जात आहे. मतदारांच्या नोंदणीत सुलभ शौचालय, पामबीच रस्ता असे वेगवेगळे पत्त्यांची नोंद होत असतानाच आता नवीनच प्रकार उघडकीस आला होता.

सुमारे १२७ मतदारांच्या नावापुढे नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निवासी पत्ता असल्याचे प्रकार समोर आला होता. या प्रकरणावर नवी मुंबईचे महापालिका आयुक्त मतदारांचा पत्ता आयुक्तांचे निवास स्थान, नवी मुंबई आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश यांनी मतदार यादीतील घोळासंबंधी चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार पत्र दाखल करण्यात आले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर गेल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरू करण्यात आलीली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी प्रक्रियाला सर्वात करण्यात आली आहे. अशातच नवी मुंबईत निवडणूक यादीत घोळ होत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी हे प्रकार उघडकीस आणत निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नेमके घडले काय ?

बेलापूर विधानसभा मतदारसंघात जुईनगर येथील सेक्टर २३ मधील नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर एका व्यक्तीची मतदार म्हणून नोंदणी झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर पामबीच रस्त्यावरच २५० मतदारांची नोंद झाल्याचे यादीत नमूद करण्यात आले होते. आणि या पलिकडे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त यांच्या नेरूळ स्थानकासमोरील निवासी पत्त्यावरच मतदारांची नोंद झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी महापालिकेचे आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्या निवासी पत्यावर कोणत्या मतदारांची नोंदणी झाली आहे, ती कुणामुळे झालेली आहे, किंवा नेमका प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयातून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला तक्रार पत्र देण्यात येणार आहे.

मनसेने केली निवडणूक आयोगाची पोलखोल

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी नुकतेच सुलभ शौचालयात मतदाराची नोंद झाल्याचा प्रकार समोर आणलं होता. त्यानंतर पामबीच रस्त्यावरील मतदारांची नोंद झाल्याचे दिसून आले. मात्र बेलापूर विधानसभेची यादी ३०० क्रमांकाची यादी गजानन काळे यांनी सादर केली. त्यात नेरूळ रेल्वे स्थानक ते पेट्रोल पंप मार्ग आयुक्त निवास या पत्त्यावर १२७ मतदारांची नोंदणी झाल्याचे काळे यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त यांचे हे सरकारी निवासस्थान आहे. त्यावर १२७ मतदारांची नोंदणी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर अमराठी आणि परराज्यातील मतदारांचे नाव या यादीत असल्याचे काळे यांनी सांगितले.