उरण : अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी म्हणजे १६ ऑगस्टला दास्तान ते चिर्ले हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र या पुलावर प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. उरण – पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या दास्तान ते चिर्ले दरम्यान रेल्वे मार्गामुळे सततच्या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यासाठी या मार्गावर उड्डाणपूल उभारून १६ ऑगस्टला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा; अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे गणेश मंडळांना आवाहन

मात्र या उड्डाणपूलावरच प्रवासी आणि येथील नागरिकांना दररोजच्या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गावरून जेएनपीटी बंदरातील कंटेनर वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्याचप्रमाणे याच मार्गावरून चिर्ले, दादरपाडा, गावठाण, जांभूळ पाडा व दिघोडे आदी गावातील नागरिक देखील ये-जा करीत आहेत. या वाढत्या कोंडीमुळे या परिसरातील नागरिकांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे कोंडी दूर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलावरच आता कोंडी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai uran citizens suffering due to traffic jam on dastan to chirle bridge css