उरणमधील संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत अनेक रस्ते पाण्याखाली, रस्त्यातील खड्डयामुळे वाहतूक मंदावली

सोमवारी रात्रीपासून संततधार व मध्ये मध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू आहे.

उरणमधील संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत अनेक रस्ते पाण्याखाली, रस्त्यातील खड्डयामुळे वाहतूक मंदावली
(संग्रहित छायाचित्र)

उरण : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर उरणमधील अनेक ठिकाणी संततधार व वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने सोमवारी रात्रीपासूनच हजेरी लावली. पावसामुळे उरण, पनवेल, नवघर पूल, फुंडे ते जेएनपीटी तसेच उरण शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. या मार्गावरील वाहनांना रस्त्यावरील पाण्याचा अंदाज घेत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे उरण पनवेल मार्गावरील वाहतूकही मंदावली होती. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

सोमवारी रात्रीपासून संततधार व मध्ये मध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जेएनपीटीच्या चौथ्या बंदराला जोडणाऱ्या न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या उड्डाणपुलाखाली काही प्रमाणात पाणी साचले होते. त्याचप्रमाणे जेएनपीटी कामगार वसाहत ते फुंडे दरम्यानच्या मार्गावरही पाणी साचून एका बाजूने दुसऱ्या बाजूला वाहत होते. उरण पनवेल मार्गावरील बोकडविरा गाव, वायू विद्युत प्रकल्प, कामगार वसाहत, सिडको कार्यालय, वीर वाजेकर महाविद्यालय तसेच नवघर फाटाजवळील रस्त्यावर पाणी भरले होते. या पावसामुळे उरण शहरातीलही नागरिकांची वर्दळ कमी झाली होती. सुट्टी असूनही पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचा परिणाम जाणवत होता.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लसून १० ते ४० रुपये किलोमागील वर्षाच्या तुलनेत मोठा दिलासा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी