नवी मुंबई : माथाडी कामगारांचे दिवंगत नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या माथाडी मेळाव्यात त्यांचे पुत्र आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्षच नरेंद्र पाटील यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनाही सोडले नाही….पाटील म्हणाले ‘ नवे कामगार मंत्री येतात. आमची अपेक्षा असते कामगारांचे भले होईल. मात्र काही घटक आहे जे कामगार मंत्र्यांना लगेच खूष करतात’. पाटील यांच्या भाषणात असे अनेक तोफगोळो होते ज्यांनी उपस्थित अवाक झाले.
नेमके काय म्हणाले नरेंद्र पाटील….
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वन मंत्री गणेश नाईक यांच्या समक्षच नरेंद्र पाटील यांनी जोरदार भाषण केले. ते म्हणाले ‘नवीन कामगार मंत्री येतात आमच्या अपेक्षा असतात. मात्र काही घटक आहे की जो कामगार मंत्र्यांना लगेच खूष करतो. कुणी पेढ देतय कुणी बर्फी देतय..कुणी गुलाबजामुन देतोय आणि त्या कामगार मंत्र्यांना मोहीत करतय आणि आम्ही बोबलत बसतोय. साहेब आमच्यावर खंडणी टाकली, आमच्यावर अन्याय झाला. आमच्या मुकादमाला मारले. पण आम्हाला न्याय मिळत नाही. आकाश फुंडकर साहेब आले. भाऊसाहेब फुंडकर साहेब यांचा मुलगा आहे.
भाऊसाहेबांचे मराठा समाजात मोठे योगदान आहे. तुमच्या नेतृत्वाखाली बैठक घ्या. टाटाचा प्रश्न मार्गी लावा. २५०-३०० कामगार आमचे आहेत, आमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होतो. मात्र कामगार घाबरले नाहीत. तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. बैठक घ्या साहेब. आपण मुख्यमंत्री होण्यापुर्वी दोन वेळा वर्षा बंगल्यावर आलो होतो…मी नाही माझे कामगार गेले होते. वर्षावर गेलो सहा तास वाट पाहीली पण आम्हाला काही देव नाही पावला. आता तुम्ही आम्हाला वेळ द्या. जवळच्या कामगारांना वेळ द्या. आम्हाला कामगार वर्गणी देतो आणि आम्ही उभे आहोत. एकनाथ शिंदेच्या काळात आम्ही पाठपुरावा केला आम्हाला मोबदला मिळाला नाही, असेही नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना खड्डयातून आणायचे होते….
राज्याचे मुख्यमंत्री खड्डयामध्ये यावेत असे कुणाचे तरी प्रयोजन होते. राज्याचे प्रमुख येत असताना बाजार समितीची जबाबदारी होती की रस्त्याची डागडुजी आहे की नाही…स्वच्छता पुरेशा प्रमाणात आहे की नाही..परंतु काल महापालिका आयुक्तांचे विशेष आभार. काल त्यांनी पहाणी केली आणि रात्रीच्या रात्री डांबर टाकले. कुणीतरी म्हटले आमची कोर्टात केस चालली होती, आम्हाला लक्ष देता येणार नाही. जयप्रकाश रावळ साहेब (पणन मंत्री) आम्ही जर हे सगळे खोदून काढले ना तर लय अडचणीचे होईल. बाजार समितीचा जोर निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. परंतु माथाडी कामगारांचा रोजगार वाढला पाहीजे, असे पाटील म्हणाले.
एशीयन पेन्टमध्ये कामगारांना देशोधडीला लावणारे काही कामगार नेते, टाटा मध्ये काही कामगार नेते आहेत. ते जरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे असले तरीही बरोजगारापासून रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या लोकांना आपल्या भाषेत घोडा लावायला हवा साहेब. सातारी भाषा आहे. ही संविधानात नाही पण या भाषेला अनुसरुन आपण काम करावे .