नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजारातील डब्ल्यू विंगमध्ये दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहे. एकूण २५ हजार चौरस फुटाचे हे अनधिकृत बांधकाम आहे. यावर नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. मात्र त्याठिकाणी आता पुन्हा जोमाने नवीन बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या कामाला प्रशासनाचे अभय आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एपीएमसी धान्य बाजारातील डब्ल्यू विंगमधे २५ हजार चौरस फुट जागेवर दुरुस्तीच्या नावाखाली तोडफोड करून बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे. जवळपास २५ हजार चौरस फुटाचे असलेल्या ८० गाळ्याची तोडफोड करून एकत्रीकरण करणाचे काम सुरू आहे. एपीएमसी संचालक मंडळाची कोणतीही परवानगी न घेता ७०-८० कार्यालयांची ब्रेकरच्या साह्याने तोडफोड व एकत्रीकरण करून अनधिकृत बांधकाम केले जात होते. धान्य बाजारातील डब्ल्यू विंगमधे व्यापाऱ्यासाठी असलेली जवळपास ८० कार्यालय एका खासगी संस्थेला देण्यात आली आहे. हे बांधकाम करण्यासाठी महापालकेची कोणतीहीप परवानगी घेण्यात आली नव्हती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यानंतर हे काम थांबवण्यात आले होते. तसेच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये देखील हा विषय चर्चेसाठी घेण्यात आला होता. त्यानंतर संचालक मंडळाने देखील येथील सुरू असलेल्या कामाचा पाहणी दौरा केला होता. तसेच यावेळी माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील आक्षेप घेतला होता. मात्र तरी देखील या ठिकाणी पुन्हा जोमाने काम सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजारातील डब्ल्यू विंग मध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. त्यांनी काम थांबवल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र पुन्हा आता काम सुरू असेल तर चौकशी करू. – प्रबोधन मवाडे, तुर्भे विभाग अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai apmc unauthorized construction action unauthorized construction grain market ssb